नमस्कार मित्रांनो, तुमचं BhaktiWel.com वर हार्दिक स्वागत आहे.
मी दिव्या देवेन्द्र गुप्ता. तसं तर आम्ही मूळचे उत्तर प्रदेशातील हरियाणा या गावातील पण आजोबा-पणजोबा पासून पुण्यातच. पुण्याच्या मध्यभागी माझं बालपण गेलं. त्यामुळे मराठी भाषेवर, मराठी संस्कृती वर विशेष प्रेम आहे माझं. मी रेणुका स्वरूप या मराठी विद्यालयात शिकली आहे. पुण्याच्या नामचीन शाळेचं विशेष म्हणजे उत्कृष्ट मराठी. त्यामुळेच मला मराठी विषयात विशेष प्रेम जाणवू लागलं. अध्यात्माकडे कल असल्यामुळे लहानपणापासूनच विविध पुस्तके वाचण्याची सवय. शेजारीपाजारी होणाऱ्या सणांचं ,व्रतवैकल्यांचा, पूजेचे बददल जाणून घेण्याची तीव्र इच्छा शक्ती मुळे मी नेहमीच चर्चा करायची. कुतूहलापोटी सगळे नीट समजावून देखील सांगायचे. वक्तृत्वात मी उत्कृष्ट होते. लिखाण करण्याचं कधी एवढे लक्ष दिलं नव्हतं. पण ज्यावेळी मी हा भक्ती वेल नावाने साईट उघडून त्यावर लिहू लागले त्यावेळेस मला कळले की मला लिखाणाची सुद्धा आवड आहे.
भक्ती वेलमध्ये आपली परंपरा, सण , देव, देवी, विविध मंत्र, विविध पूजा, वृत्त वैकल्य, संत इत्यादी गोष्टींवर मी लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. खरं सांगायचं तर मी एक गृहिणी असून मला टेक्नॉलॉजी विषय विशेष काही ज्ञान नाही आहे. पण माझी मुलगी मिताली व मैत्रीण निकिता यांच्या मदतीने मी भक्तीवेल ही साईट चालू करून त्यावर लिहीत आहे.
भक्ती वेळ ही केवळ एक साईट नसून आपण त्यामध्ये हे जाणून घेणार आहोत. की पूर्वीच्या काळी का एवढ्या प्रथा प्रचलित झाल्या?
त्यांचे पालन का केले जात असावे?
त्यांच्यामुळे होणारे चांगले वाईट परिणाम
वेळोवेळी पूजा व प्रसाद यांच्या मध्ये केलेले बदल,
या सगळ्या अंधश्रद्धा नसून हवामानात व शरीरात होणाऱ्या बदलामुळे आहारात कोणता बदल घडून आला पाहिजे याबद्दल विशेष माहिती आहे. स्वतःच्या व मानव जातीच्या चांगल्यासाठी प्रत्येक व्यक्तीने अध्यात्मिक ते कडे वाटचाल केलीच पाहिजे.
BhaktiWel हि वेबसाईट 2022 मध्ये प्रस्तापित केली आहे.
धन्यवाद !!!