पर्वतशिखरांचा समूह म्हणजे श्रीगिरनार दत्तात्रेयांनी जिथे प्रत्यक्ष निवास केला आहे असे ठिकाण
गिरनार पर्वत चढणे म्हणजे दहा हजार पायऱ्यांचा गड चढणे. यामध्येच विचार करा हा अनुभव किती भव्य आणि दिव्य असेल.
शिवपुराणात गिरनार चा उल्लेख रेवताचल पर्वत म्हणून करण्यात आला आहे.
स्कंद पुराणात रैवत, रेवताचल, कुमुद, उज्जयंत अशी गिरनारची नावे आढळतात.
मृगी कुंडातील सिध्दांचे स्नान हे यातील प्रमुख आकर्षण असते.असे मानले जाते की, स्वयं भगवान शिव या कुंडात स्नानासाठी येतात.
इथे ५,००० वर्षे पासून असलेली अखंड धुनी आहे. ही धुनी एक दैवदुर्लभ देणगी आहे. अग्नीरुपानं साक्षात् श्रीदत्तप्रभूच तिथे प्रकटतात
गिरनारच्या 9999 पायऱ्या चढताना प्रत्येक वेळी हा अनुभव निश्चितच येतो. स्वतःमधील “ मी” ला मारणे किती आवश्यक आहे , त्याचप्रमाणे त्यालाही महत्त्व किती आहे हे सांगून जाते.